Ad will apear here
Next
वैज्ञानिक कट्ट्यावर सचिन सातपुते
सचिन सातपुतेपुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र  व  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर एमकेसीएलच्या ई-प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक सचिन सातपुते येणार आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा त्यांच्या गप्पांचा विषय असणार आहे.  २४ मार्च रोजी  दुपारी चार वाजता सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या सभागृहात हा वैज्ञानिक कट्टा भरणार आहे. 

कृत्रिम बुद्धीमत्ता आहे तरी काय?  आपल्या दैनंदिन वापरात आज ती कुठे आहे? आपण या यंत्रांची हुशारी कुठे वापरू शकतो? त्यांचे वेगवेगळे प्रकार आणि उपयोग कोणते? आपल्यापैकी प्रत्येकाला ते हाताळता येऊ शकतात का? नवीन तंत्रात नवीन पिढीला संधी काय आहेत, या बद्दल सचिन सातपुते बोलणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या कट्ट्यावर सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी केले.

कार्यक्रमाविषयी : 
दिनांक : २४ मार्च २०१८, शनिवार
वेळ : दुपारी चार
ठिकाण : मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र, सेनापती बापट रस्ता, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNYBM
Similar Posts
वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. रत्नदीप जोशी पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. रत्नदीप जोशी या कट्ट्यावर येणार असून, ‘दैनंदिन जीवनात रासायनिक अभियांत्रिकीचा वापर’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत
‘कष्टाऐवजी बुद्धीच्या कामांना प्राधान्य’ पुणे : ​‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापराने आज अनेक उपकरणे विकसित होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारी ही उपकरणे भविष्यात माणसाचे आयुर्मान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अवघड आणि अशक्य कामे रोबोटकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे माणसाला यापुढे कष्टाची नाही, तर बुद्धीची कामे करण्याला प्राधान्य
मानवी संस्कृतीच्या अभ्यासात‘डीएनए’मोठी संधी पुणे : ‘मानवी संस्कृती, पर्यावरण आदी गोष्टींच्या अभ्यासासाठी उत्खनन महत्वाचे ठरते. पुरातत्वशास्त्राने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. हजारो वर्षांपूर्वी मानवी वस्त्या कशा असतील, त्यावेळचे राहणीमान, व्यापार, पर्यावरण कसे असेल, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी आज अनेक ठिकाणी उत्खनन सुरु आहे. या मानवी संस्कृतीच्या
‘शेतकऱ्यांनी नैसर्गिक खतांचा वापर करावा’ पुणे : ‘नैसर्गिक खते शेतीसाठी अधिक उपयुक्त असतात. त्यातून उत्तम दर्जाचे उत्पन्न निघू शकते. शिवाय, विषमुक्त शेती करणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रसायनाचा अधिक वापर करण्यापेक्षा उपलब्ध नैसर्गिक आणि पोषक खतांचा वापर करावा. यासाठी अझोलासारख्या पाणवनस्पतीचे संवर्धन करून आपण कसा वापर करू शकतो यावर काम

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language